Tuesday , April 7 2026
Breaking News

शिवजयंती उत्सव मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा शुभम शेळके यांचा राजीनामा

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यामुळे मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकताच जाहीर झाली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड झाल्याने उपाध्यक्ष शुभम शेळके यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.

शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या पारंपारिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड अशी तडकाफडकी हे परंपरेला शोभणारे नसून या निवडीला माझा वैयक्तिक आक्षेप आहे व ही निवड योग्य नसून गेल्या 40 वर्षात अनेक मंडळातून कार्यरत कार्यकर्ते व ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन निवड होणे अपेक्षित होते पण तसे न होता काही मोजक्याच लोकांच्या कानभरणी वरून ही निवड झाली असून ही व्यक्तीशा मला मान्य नाही म्हणून मी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करावा असा मजकूर शुभम शेळके यांनी राजीनामा पत्रात नमूद केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत अत्याचार करणाऱ्या तरूणाला शहापूर पोलिसांकडून अटक

Spread the love  बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *