
बेळगाव : श्रीराम सेना संघटनेची उत्तर कर्नाटक प्रांतस्तरीय बैठक रविवारी बेळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील धर्मजागृती, गोरक्षा तसेच तथाकथित ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर संघटनेने अधिक आक्रमक व ठोस भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
उत्तर कर्नाटक प्रांताध्यक्ष श्री. रविकुमार कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच, गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी येत्या 27 एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta