
बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक वादातून बारा वर्षांपूर्वी येळ्ळूर येथे निष्पाप ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व सात खटल्यांमधील सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
२७ जुलै २०१४ रोजी “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” असा फलक हटवल्यानंतर पोलीस प्रशासनाने एकूण ७ खटले दाखल केले होते. यापूर्वीच्या ५ खटल्यातून सर्व निर्दोष सुटले होते. उर्वरित २ खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून यामधील सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
खटला नंबर १२२/२०१५ मध्ये अर्जुन गोरल, रमेश घाडी, नंदू कुगजी, मारुती देसाई, पिंटू धामणेकर, बसवंत लोहार, श्रीकांत नांदुरकर, सागर काकतकर, अमित जाधव, मनोहर कुंडेकर, विठ्ठल कुरंगी, शंकर कणबरकर, परशुराम कंग्राळकर, अनंत कंग्राळकर, शिवाजी जाधव, प्रशांत कुगजी, अर्जुन चौगुले, प्रशांत टक्केकर, परशुराम धामणेकर, अनंत कुंडेकर, मधु कुगजी, कृष्णा काकतकर, अशोक धामणेकर, तानाजी हलगेकर, मारुती गोरल, चांगप्पा हलगेकर, अरविंद पाटील, नारायण काकतकर, शामला जाधव, सुधा जाधव, मलन जाधव, कमल पोटे, जयश्री खादरवाडकर, रामचंद्र बागेवाडी, विकास पाटील, सुनील पाटील आणि सतीश कुगजी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याच खटल्यामधील प्रवीण धामणेकर हे सतत गैरहजर राहिल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले. यापूर्वी सूरज नायकोजी, सतीश जाधव, नारायण कंग्राळकर, अनंत पाटील, संजय गोरल आणि प्रशांत जाधव या सहा जणांची नावे वगळण्यात आली होती. दुर्दैवाने या प्रदीर्घ लढाईत अरुण यळ्ळूरकर, बाळू मजुकर आणि शिवाजी काकतकर या तिघांचे निधन झाले आहे.
खटला नंबर १२६ मध्ये आज १९ आरोपी हजर होते ज्यांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये अर्जुन गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिट्ठी, वृशेषन पाटील, संभाजी हट्टीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, श्रीकांत नांदुरकर, राहुल कुगजी, नागेश बोबटे, सुनील कुंडेकर, रवळू कुगजी, केशव हलगेकर, गणपती पाटील, नामदेव नायकोजी, केशव पाटील, रमेश धामणेकर, रामचंद्र कुगजी आणि सतीश कुगजी यांचा समावेश आहे. या खटल्यातूनही सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
वारंवार गैरहजर राहिल्यामुळे परशुराम कुंडेकर, गणेश पाटील, जयंत पाटील, सातेरी बेळवटकर आणि रामचंद्र बागेवाडी या पाच आरोपींना खटल्यामधून वगळण्यात आले आहे. या प्रकरणाचे काम ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. श्याम पाटील आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta