Friday , November 6 2026
Breaking News

बेळगावमधील शिक्षकांच्या बदल्यांचा पेच अखेर सुटला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या आणि जनगणनेच्या कामावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. जनगणनेच्या कारणास्तव बदल्यांना स्थगिती दिल्याने शिक्षक अडचणीत आले होते, मात्र प्रशासनाने आता यावर सकारात्मक तोडगा काढला आहे.

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ आणि माध्यमिक शाळा शिक्षक संघ बेळगाव युनिटच्या वतीने या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जनगणनेच्या कामाचे नियोजन करून शिक्षकांच्या बदल्यांमधील अडथळे दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.जनगणनेच्या कामामुळे बदली झालेल्या आणि पदोन्नती मिळालेल्या मुख्याध्यापकांना १५ मे नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश पूर्वी देण्यात आले होते. यामुळे शिक्षकांची गैरसोय होत होती. बदली झालेल्या शिक्षकांनी त्यांच्या नवीन नियुक्त ठिकाणी हजर होऊन, त्यानंतर जनगणनेची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करावी, अशी चर्चा जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला तातडीने प्रतिसाद देत शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत, असे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी म्हटले. यावेळी गजानन सोगलन्नवर, रमेश धोणी यांच्यासह शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *