Monday , September 21 2026
Breaking News

कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (पुणे) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेचा साहित्य सेवा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : कडोली, ता. येथील मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (पुणे) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेचा साहित्य सेवा सन्मान प्राप्त झाला आहे.
संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेने नुकतीच केली असून ता. 2 मे 2026 रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्काराबद्दल संघाचे अभिनंदन होत आहे.
संघातर्फे गेली 41 वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि मराठी संस्कृतीच्या जोपासनेचे कार्य अखंडपणे सुरु आहे. संघातर्फे दरवर्षी मराठी साहित्य संमेलनाबरोबरच मराठी भाषा गौरव दिवस, जागतिक महिला दिवस, कै. सुरेशजी हुंदरे स्मृती स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला, नवरात्रौत्सव प्रबोधन, मुलासाठी किल्ला स्पर्धा, तसेच भाषण, निबंध, सामान्यज्ञान, हस्ताक्षर, काव्यलेखन, काव्यवाचन, महिलांसाठी रांगोळी व अन्य स्पर्धा, कविसंमेलने, कथाकथन, विविध विषयांवरची तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, राष्ट्रीय सण, राष्ट्र पुरुष व महिला आणि साहित्यिकांच्या जयंत्या व पुण्यतिथी कार्यक्रम असे वर्षभर विविध लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
संघाच्या या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखक, कवी, वक्ते घडले आहेत. संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत. साहित्याबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी अनेक मराठीप्रेमी संस्था आणि व्यक्तींचे मोलाचे आर्थिक व अन्य सहकार्य संघाला लाभत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील नामवंत लेखक, कवी, विचारवंत आणि कलावंतानी या विचार पिठावरून आपले विचार मांडले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *