बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या दिवशी खानापूर, बेळगाव व इतर भागातून पन्नास हजाराहून अधिक पत्रे पाठवली जाणार आहेत.
खानापूर तालुका युवा समितीच्यावतीने सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा यासाठी पत्र पाठवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानंतर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर शहर, गर्लगुंजी, जांबोटी कणकुंबी, हलसी, नंदगड, हलगा, निडगल, कुप्पटगिरी आदी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तसेच बेळगाव शहर व तालुका तसेच निपाणी भागात जाऊन विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन अधिक संख्येने पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव तालुका, खानापूर तालुका, निपाणी विभाग समिती, म. ए. समिती महिला आघाडी, शिवसेना आधी संघटनानी पत्र पाठवण्याच्या मोहिमेत सहभागी होत अधिक संख्येने पत्र पाठविण्याचे आवाहन केल्यानंतर पत्र पाठवण्याची संख्या वाढली असून अनेक जण पत्र करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे एकाच दिवशी पंतप्रधान कार्यालय हजारो पत्रे पाठवली जाणार आहेत. खानापूर तालुका युवा समितीचे कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसांपासून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.
प्रतिक्रिया
पत्र पाठवण्याचा मोहिमेला चांगला पाठिंबा मिळाला असून मराठी भाषिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, प्रधानमंत्री कार्यालय साऊथ ब्लॉक, न्यू दिल्ली (पिन कोड 110011 ) या पत्यावर पत्र पाठवावे
– धनंजय पाटील, अध्यक्ष, युवा समिती खानापूर
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …