टोक्यो : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. तब्बल तेरा वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 व दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करत विजयाची नांदी दिली. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर तर निरजचा चौथा प्रयत्न फाऊल ठरला. दरम्यान दुसऱ्या प्रयत्नात निरजने घेतलेली विजयी आघाडी अन्य देशांच्या खेळाडूंना भेदता आली नाही.
