Saturday , July 27 2024
Breaking News

बजरंग पुनिया कांस्य पदकाचा मानकरी

Spread the love

टोकियो : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कझाकिस्तानच्या डाऊलेट नियाझबेकोव्हशी कांस्य पदकासाठी भिडला. त्याने सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत ८–० अशा गुण फरकाने कांस्य पदकावर नाव कोरले.
बजरंगने पहिल्यापासून सामन्यावर पकड मिळवून दोन गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने चार गुणांचा कमाई करत आघाडी ६–० अशी नेली.
सामन्यास काही सेकंद शिल्लक असताना त्याने कझाकिस्तानच्या डाऊलेटच्या पायावर आपली पकड मजबूत करत दोन गुणांची कमाई केली. अखेर बजरंग पुनियाने सामना ८–० असा सहज जिंकत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे सहावे पदक आहे. भारताने यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सहा पदके जिंकली होती. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याच्याशी बरोबरी झाली आहे. जर भालाफेकपटू नीरज चोप्राने पदकाला गवसणी घातली तर यंदाचे टोकियो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरेल.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *