खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लालवाडी- चापगाव रस्त्यावरील कारलगा गावजवळील पुलाचा काही भाग नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे भविष्यात याचा पुलाला धोका पोहोचू शकतो. त्याच बरोबर याच कारलगा पुलाच्या मधोमध भगदाड पडले आहे. त्यामुळे दुचाकी, अथवा चार चाकी वाहने जाताना धोका संभवतो आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी वाहनाना जाताना भगदाडाचा धोका आहे.
याची दखल घेऊन तालुका पंचायतीचे माजी सभापती सयाजी पाटील, चापगाव ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मारूती चोपडे यांनी नुकताच पाहणी करून संबंधित खात्याला याबाबत सुचना करणार असल्याचे बोलताना सांगितले.
लालवाडी-चापगाव रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशी वर्गाला याचा धोका असतो. यासाठी याभागातील नागरिकांनी पुलाची दुरूस्ती व्हावी अशी मागणी केली आहे.
*प्रतिक्रिया
यंदाच्या मुसळधार पावसाने या पुलाची दुरावस्था झाली आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने दुरूस्ती लवकर हाती घ्यावी. अन्यथा या भागातील प्रवाशांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागणार आहे.
– सयाजी पाटील,
माजी सभापती ता. प. खानापूर
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …