
बेळगाव : डॉ. श्रुती पानसे ह्या महाराष्ट्रातील मेंदू आधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून त्यांनी ‘मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र’ या विषयात पीएच.डी. केली आहे. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘चिकूपिकू’ या मुलांच्या आवडत्या मासिकाच्या त्या संस्थापक संपादक आहेत. अभ्यास आनंददायक कसा कराल? अशी का वागतात मुलं? आधुनिक स्फूर्ति कथा, टीनएजर्सच्या मनात, डोक्यात डोकवा, पहिली आठ वर्ष – सहज शिकण्याची, बहुरंगी बुद्धिमता, मुलांचे ताण जबाबदारी पालकांची ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके.
डॉ. श्रुती पानसे दि. ११ व १२ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या कामाचे स्वरूप, व्याप्ती व महत्त्व समजून घेण्यासाठी व त्याची ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी बेळगावात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठी विद्यानिकेतन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta