Sunday , September 20 2026
Breaking News

गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा बीम्स रुग्णालयात मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : तुरमरी येथील एका गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू बेळगावमधील बीम्स रुग्णालयात झाला असून याप्रकरणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बेळगाव तालुक्यातील तुरमरी येथील इरम्मा शिगीहळ्ळी (वय २१) या गर्भवतीला १० एप्रिल रोजी बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती होईल असे सांगितले होते, मात्र वेळेवर उपचार न केल्याने पत्नी आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नागराज यांनी केला आहे. मृत्यू झाल्यानंतर मध्यरात्री गुपचूप सह्या घेऊन मृतदेह पाठवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केल्याचेही नातेवाईकांनी म्हटले आहे. १० एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होईल असे सांगितले होते, मात्र पत्नी आणि बाळ दगावल्यानंतर माझी सही घेण्यात आली. आम्ही विनंती करत असताना “आम्ही डॉक्टर आहोत की तुम्ही?” असे विचारून डॉक्टरांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले, असे नागराज यांनी सांगितले. जुलाब थांबल्यानंतर प्रसूती करू असे डॉक्टरांनी सांगितले होते. तिचे हे पहिलेच बाळंतपण होते आणि तिने याच ठिकाणी कामही केले होते. प्रसूती वेदना वाढल्यावर सिझेरियन करण्याची विनंती करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी मृत इरम्माची आई गौरव्वा यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *