
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा दिलीप मोहिते ही कर्नाटक राज्यात बारावीच्या परीक्षेमध्ये चौदाव्या स्थानी तर महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत 97.66 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच भौतिकशास्त्र व गणित विषयात पैकीच्या पैकी गुण तिने घेतलेले आहे. चंदगड तालुक्यातील तुडीयेसारख्या ग्रामीण भागातून ती बसचा प्रवास करून रोज महाविद्यालयाला येत होती. तिचे वडील भारतीय सेनेतून निवृत्त आहेत त्यासाठी अगदी शिस्तबद्ध महाविद्यालयाच्या सर्व स्पर्धांमध्ये सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ही ती आवर्जून भाग घेत होती सर्वगुण संपन्न अशी विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती महाविद्यालयात होती. तिच्या या यशामुळे तिचं कौतुक होत आहे. इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांनी असे यश संपन्न करावं यासाठी तिचे उदाहरण आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जात आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस एस पाटील तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta