बेळगाव : ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचे आहेत. राजीनामा देणार नाही असे सांगत बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्याना काय म्हणावं? असा संताप काँग्रेस विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय.
आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बेंगलोर होऊन बेळगावला विशेष विमानाने आलेल्या काँग्रेसने नेत्यांनी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील संताप व्यक्त केला आहे.
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कॉंग्रेस प्रभारी रणजीत सुरजेवाला यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी बेळगावात दाखल झालेले आहेत.
मंत्री किंवा सरकारच्या ‘हो करा’ शिवाय कोणताही ठेकेदार काम करणे शक्य नाही. हा कॉमन सेन्स असलेला विषय आहे. कंत्राटदार संतोष पाटील याने कर्ज काढून काम पूर्ण केलेल आहे. त्याला ४०% कमिशनसाठी छळण्यात आले आहे. असे केवळ ईश्वरप्पाचं नव्हे तर सरकारमधील सर्वच मंत्री करत असतात, असा आरोप यावेळी सिद्धरामय्या यांनी केला.
वर्क ऑर्डर नसताना काम केला या भाजपच्या भूमिकेवर सिद्धरामय्या म्हणाले की, गेल्या नंबर महिन्यांमध्येच ईश्वरप्पा ४० टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप संतोष पाटील यांनी माध्यमांकडे केला होता. त्यावेळी का कारवाई केली गेली नाही? पंतप्रधानांसहित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करण्यात आली होती. आता वर्क ऑर्डर बोलत आहेत असे त्यांनी नमूद केलं.
यावेळी विमानतळावर ईश्वर खंड्रे, माजी मंत्री एम. बी. पाटील, राजू सेठ आदी उपस्थित होते.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …