Sunday , September 8 2024
Breaking News

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आवश्यक : शिक्षण मंत्री बी. सी. नागेश

Spread the love

बेळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत आहेत. यामुळे भविष्यात विविध क्षेत्रांचा विकास होईल. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी केले आहे. आज बुधवारी गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० शैक्षणिक कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मंत्री नागेश म्हणाले, देशात प्रथमच कर्नाटक राज्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे. 34 वर्षात लागू करण्यात आलेले हे पहिले शैक्षणिक धोरण असून देशातील विविध क्षेत्रात बदल घडतील. या शैक्षणिक धोरणाचा उद्देश भारताला ज्ञानाचे एक मजबूत राष्ट्र, सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण, एक समान आणि गतिमान ज्ञान देणारा समाज बनवणे हा आहे. शिक्षण हे समाजाच्या अगदी शेवटपर्यंत असले पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणात आणि उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना आम.अनिल बेनके म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वेक्षणाद्वारे जनतेशी सल्लामसलत करून प्रकाशित करण्यात आले आहे. चांगले शिक्षणच समाजात बदल घडवून आणू शकते, असा विश्वास आम. बेनके यांनी व्यक्त केला.

विधानसभेचे सदस्य अरुण शाहपुर, विधानसभा सदस्य हनुमंत निराणी, ​​डीडीपीआय मन्निकेरी आणि शिक्षक संघाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *