Wednesday , March 4 2026
Breaking News

घुमटमाळ मारुती मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रम

Spread the love


बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दि. 15  व शनिवारी दि. 16 विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन, सूर्योदयास जन्मकाल व आरती, सात ते नऊ तीर्थप्रसाद, दुपारी बारा ते तीन महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. तरी भक्तांनी या कार्यक्रमाना उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिराच्या ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी व सहकार्यानी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *