बेळगाव : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी प्रत्येक क्षणाला नवनवे दावे केले जात असून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही आता याप्रकरणी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याबाबत सीडी प्रकरणी रचण्यात आलेल्या षडयंत्रातील समूहाचा संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत याप्रकरणी ईश्वरप्पांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रमेश जारकीहोळी यांच्या गाजलेल्या सीडी प्रकरणात सहभागी असलेल्या गटाचाच संतोष पाटील यांच्या आत्महत्येशी संबंध असून आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राप्रमाणे हे प्रकरण घडल्याचे जारकीहोळी म्हणाले.
संतोष पाटील यांच्या गावी भेट देऊन त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर जारकीहोळी यांनी संतोष पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत ईश्वरप्पानी कोणत्याही कारणास्तव राजीनामा देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा तपास होईल, चौकशी होईल. चौकशीअंती अहवालात दोषी आढळ्यास नक्कीच कारवाई होईल. परंतु तोवर ईश्वरप्पानी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे जारकीहोळी असे म्हणाले.
हायकमांडची परवानगी घेऊन सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात नवनव्या चर्चांना उधाण आले असून आता रमेश जारकीहोळी यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …