Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात पार्श्वलब्दीतर्फे महाप्रसाद वाटप

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पार्श्वलब्दी ग्रुप, श्रावकगण आणि बेळगांव पार्श्वलब्दी सेवा ट्रस्टच्या वतीने वर्धमान महावीर जयंती आणि परमपूज्य कर्नाटक केसरी आचार्य श्री भद्रंकरसूरीश्वरजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर समुदाय भवनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धमान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादसेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पार्श्वलब्दी ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसाद कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, बसवराज बागलकोटी, प्रकाश फडी, गंगाधर पट्टणशेट्टी, सचिन सपाटे, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *