बेळगाव : बेळगाव कॅम्प येथे राहणाऱ्या नेहल धनराज निपाणीकर याची सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी(ACIO)पदी नियुक्ती झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये थेट अधिकारी बनल्याने या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालात नेहल निपाणीकर यांची इंटेलिजन्स ब्युरोत अससिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे.
निहाल हा लहानपणापासून हुशार विध्यार्थी होता त्याचे प्राथमिक व हायस्कुलचे शिक्षण सेंट पॉल तर सरकारी पॉलिटेक्निक मधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण करत आर व्ही कॉलेजमधून बी. ई. इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली होती.
गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंटेलिजन्स अधिकारी पदासाठी त्यांनी परीक्षा दिली होती या परीक्षेत उत्तीर्ण होताच त्याची नियुक्ती अससिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदी झाली आहे.
नेहल धनराज निपाणीकर यांचे मोठे भाऊ निखिल धनराज निपाणीकर आयएएस परिक्षा उत्तीर्ण केली होती. ते सध्या बिहारमध्ये कार्यरत आहेत. मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आणि सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर यांचा नेहल हा भाचा होय. कॅम्पमधील युवकाच्या या यशामुळे त्याचे कौतुक होत आहे.
