बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेत विद्याभारती बेळगांव जिल्हा संघटनेच्यावतीने संत मीरा शिक्षकांना, पालक व मुलांना चिकनगुनिया डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली.
विद्याभारती बेळगाव जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार, शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता वरपे, विना जोशी व विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी यांच्या हस्ते शिक्षकांना व पालकांना डेंगू, चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यात आली.
याप्रसंगी विद्याभारती जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी यांनी आगामी काळात येणार्या तिसर्या लाटेबाबत जागृती बाळगली पाहिजे व सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले, याप्रसंगी गीता हळदणकर, श्रद्धा मेंडके, माणिक उपाध्ये, धनश्री सावंत, नीला धाकलूचे, बसवराजेश्वरी नाडगौडा, सुप्रिया पाटील, रूपा पाटील, अरुणा पुरोहित, अमृता पेटकर, माधुरी अनगोळकर, विनाश्री तूक्कार, सरोजा कटगेरी, माधवी पालकर, प्रिती कोलकार, गायत्री शिंद्रे, निकीता मेणसे, बसवंत पाटील, सह शिक्षक, पालक वर्ग उपस्थित होता.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …