बेळगाव : हिंदवाडी -आनंदवाडी येथील आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबतर्फे माणिकबाग उद्योग समूहाचे संचालक रमेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.
हुबळी -धारवाड चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ’वाणिज्य रत्न’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश शहा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबचे अध्यक्ष चारुदत्त नलगे, सेक्रेटरी सुरेश बोकडे, सभासद राजकुमार सुतार, श्याम मुचंडी, रवी वरुटे, श्रीकांत सुतकट्टी, कृष्णा गोवेकर, कुमार पाटील, बळीराम कटांबळे, किरण कुलकर्णी, दानप्पा हातरोटी, मुरली हावळाण्णाचे, प्रकाश माने, शिवाजी मुचंडी, प्रताप शेट्टी, यल्लाप्पा अकणोजी, शशिकांत रणदिवे आदी उपस्थित होते.
