Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; ३ सप्टेंबरला मतदान

Spread the love

बेळगाव : बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा बेळगांवकरांना लागून राहिली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे.

निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट आहे. २४ ऑगस्ट ही अर्ज पडताळणीची तारीख असून २६ ऑगस्ट रोजी अर्ज माघारी घेता येणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असुन ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *