बेळगाव महापालिका निवडणूक
उच्च न्यायालयाच्या धारवाड धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित असताना, राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली आहे. या विरोधात याचिकाकर्त्यांनी आज गुरुवारी मेमो दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मेमो दाखल करण्यासाठी याचिकाकर्ते आज धारवाडला जाणार आहे जाणार आहेत.
याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली जाणार आहे. 2018 सालची प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाविरोधात जानेवारी 2019 मध्ये धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय होण्याआधीच नगरविकास खात्याने 19 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले. मे महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा आदेश बजावला. कोरोना लॉकडाऊन व उन्हाळी सुट्टीमुळे या याचिकेवर सुनावणीसाठी आयोगाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली होती.
न्यायालयाने मुदत दिल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी होणार होती. बेंगलोर उच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या एका याचिकेवर ही महापालिका निवडणुकी संबंधित 13 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यामुळे, आज गुरुवारी निवडणुकीत विरोधात मेमो दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.