Friday , October 18 2024
Breaking News

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

Spread the love

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी शिवरायांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे आमदार अनिल बेनके यांनी शिवभक्तांना सांगितले.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने विविध गडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले. यावेळी सुनील जाधव म्हणाले, हिंदुचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. त्यांचे विचार आणि आचार आजच्या तरूण पिढीने स्मरणात ठेवावेत जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढील जीवनात ते प्रेरणादायी ठरतील. शिवजयंती महामंडळाच्या वतीने बहुजन समाजाचे हित हेच आमचे ब्रीद असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जयजयकार केला. शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *