बेळगाव (वार्ता) कला आणि हस्तकला क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड व ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. टाकाऊ वस्तूपासून उत्कृष्ट वस्तू बनवण्याची अनोखी कला योगिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे.
जसे की सुतळीपासून हँगिंग आणि कोस्टर बनवणे, टाकाऊ फुलांच्या पुष्पगुच्छातून सजावटीचे डायस बनवणे, टाकाऊ प्लायवुडमधून आकर्षक दिवे बनवणे, बांबूपासून सजावटीच्या वस्तू बनवणे.
त्यांनी 100 पेक्षा जास्त सजावटीच्या वस्तू, 50 पेक्षा जास्त प्रकारच्या वॉल हँगिंग वस्तू बनवल्या आहेत ज्या घरगुती वापरासाठी व सर्व टाकाऊ वस्तूपासून बनवल्या आहेत. कला क्षेत्रातील अनन्यसाधारण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान लाभला आहे.
बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांचे हस्तकला व पाक कला हे त्यांचे आवडते क्षेत्र. गेली २० ते २५ वर्ष क्राफ्ट बनवते आहे. वेगवेगळ्या वस्तू बनवून ते
पाककलेत मध्ये काही तरी वेगळे करायचे म्हणून प्रीमिक्स बनवायला शिकून. केक प्रेमिक्स ब्रेक फास्ट प्रीमिक्स ज्याचा उपयोग हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थीसाठी आणि नोकरदार महिला आणि जे विद्यार्थी परदेशात शिकायला जातात त्यांच्यासाठी तसेच सूप प्रीमिक्स, ग्रेव्ही प्रीमिक्स अशी अनेक प्रकारचे प्रीमिक्स त्यांनी बनवली आहेत. त्यांच्या या उत्पादनांची नोंद दोन रेकॉर्डमध्ये झाली त्याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्यात त्यांचे कुटुंबीय आणि विक्रांत व सुचेता इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले असे ‘बेळगाव वार्ता’शी बोलताना त्यांनी सांगितले.