Saturday , March 7 2026
Breaking News

पोहताना मारलेला ‘सूर’ जीवावर बेतला!

Spread the love


बेळगाव : पाण्यात स्विमींग पूलमध्ये मारलेला सूर एका युवकाच्या जीवावर बेतला असून सूर मारल्यानंतर डोकीला जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बेळगाव शहरातील हनुमान नगर भागांत ही घटना घडली आहे.
17 वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता हनुमान नगर येथे घडली आहे. गुरुदेव सिंग, राहणार कमांडो क्वाटर्स कॅम्प बेळगाव असे त्या युवकाचे नाव आहे.
गुरुदेव सिंग हा उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावावी या हेतूने हनुमान नगर येथील जलतरण तलावात पोहोण्याच्या सरावासाठी जात होता.
रोजच्याप्रमाणे तो पोहण्यासाठी गेला होता. काहीवेळ पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर तो सूर मारण्यासाठी बारा फूट उंचीवर असणार्‍या फळीवर गेला आणि तेथून त्याने पाण्यात सूर मारला. यावेळी त्याच्या डोकीला मार लागून गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *