
बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेला जगत ज्योती बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती निमित्त आणि शिवजयंतीनिमित्त शिव पारायण पठण, श्री बसवेश्वर महाराजांनी रचलेले वचनांचे पठण व या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. सालाबादप्रमाणे अक्षय तृतीया निमित्त आकर्षक अशी आंब्याची आरास संपूर्ण गाभारा आणि शिवलिंग फळांचा राजा आंब्याने सजवण्यात आला आहे.
सदर आरास साकारण्यासाठी सचिन आनंदाचे, गणेश देवर, राजू पाटील यांनी परिश्रम घेतले. पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातखांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, संजय मणगूतकर, नंदू गुरव, बसनगौडा पाटील आधी ट्रस्टी सेवेकरी भक्तगण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta