Sunday , July 26 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर होते. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञानातील पोषण आहार गीताने झाली. त्यानंतर सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नरेंद्र मजूकर आणि विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. वाय. बी. कंग्राळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत विद्यार्थी समर्थ डणकारे यांनी केले व पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची विज्ञान दिना बद्दल त्याचप्रमाणे हा दिन साजरा करण्याचा हेतू याबद्दल भाषणे झाली. बेळगाव या ठिकाणी घेण्यात आलेल्या विज्ञान कथाकथन स्पर्धेमध्ये नंबर मिळवलेली लक्ष्मी पाटील हिने या विज्ञान दिनाचे औचित्य साधूनआपले विज्ञान कथाकथन विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यानंतर ए. बी. कांबळे, वाय. बी. कंग्राळकर आणि प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत सर यांचे विज्ञान दिनाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. शेवटी नरेंद्र मजुकर सर यांनी सांगितले की, विज्ञान दिन साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आसक्ती निर्माण करून पुढील भावी आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा एक चांगले शास्त्रज्ञ बनाल आणि देशाच्या विकासासाठी हातभार लावाल हाच विज्ञान दिन साजरा करण्याबद्दलचा हेतू आहे. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनीनी हातभार लावला. त्यानंतर विज्ञान वस्तू प्रदर्शनाचे व आकृत्यांचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. वाय. बी. कंग्राळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनोखी घाडी आणि समीक्षा कुगजी तसेच आभार प्रदर्शन वेदांत कुगजी या विद्यार्थ्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *