Thursday , December 11 2025
Breaking News

3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

Spread the love

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास
काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते, सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषिवणार असून विशेष अतिथी म्हणून काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत, साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हा अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरमध्ये नूतन एसडीएमसी अध्यक्षपदी दिव्या कुंडेकर

Spread the love  स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *