कराड : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या 65 वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले. सामान्य माराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्यापरीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले. असा हा रक्तरंजित लढा आजतागायत सूरु आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी लक्ष घालून लवकरात लवकर सोडवावा याकरिता कराड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत letter To PM या मथळ्याखाली पत्र मोहिम राबवत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे 500 पत्रे मा.पंतप्रधानांना पाठवली.
सीमाप्रश्न मार्गी लावून 40 लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा. आशा भावना तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या व कराड तालुक्याच्यावतीने सीमावासीयांना पाठिंबा दर्शविला.
यावेळी वैष्णव काशीद पाटील, धैर्यशील कदम, समर्थ सूर्यवंशी, यश अतकरे, आदिती देशमुख, वैष्णवी जाधव, पल्लवी जायभाये, वैष्णवी सर्वज्ञ यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली.
