बेळगाव : मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन मराठा सभागृह गणेश कॉलनी संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्वराज्य फर्निचरचे मालक हिरामनी शिंदे यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मोहन बालाजी पाटील (मुख्याध्यापक मराठी शाळा येळ्ळूरवाडी) यांनी केले तर माँ. जिजाऊ प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात माँ. जिजाऊ वंदना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली.
प्रमुख वक्ते मोहन पाटील बोलताना म्हणाले की, मराठी शाळा आणि मराठी संस्कृती टिकविणे हे आपल्याच हातात आहे. तर श्री. भागोजी पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी युवक वेगवेगळ्या संस्थेतर्फे राष्ट्रीय पक्षाशी जोडले जात आहेत याबद्दल खेद व्यक्त केला. महादेव पाटील यांनी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली व मराठा सेवा संघ वाढविण्यासाठी समाजातील युवकांनी संघटित होऊन साथ द्यावी, असे म्हणाले.
दत्ता उघाडे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी खानापूर युवा समितीने 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सीमाप्रश्नी पत्र पाठवण्याची मोहीम राबविली त्या मोहिमेला मराठा सेवा संघातर्फे पाठिंबा व्यक्त केला.
कार्यक्रमाला महोनर घाडी, विवेक शिंदोळकर, अतुल शिंदोळकर, नवजीत पोटे, किरण नंद्याळकर, ढकलू करविंनकोप, विठ्ठल कुरंगी, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, उमेश पाटील, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, रमेश खेमनाळकर, बाबू मजुकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सेक्रेटरी मनोहर घाडी यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष किरण धामणेकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन दीपक कोलेकर यांनी केले.
Check Also
सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
Spread the love बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …