महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी अनधिकृत झेंडे हटवा यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नमूद विषयाप्रमाणे बेळगावमधील महानगरपालिका, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, हेस्कॉम कार्यालय, रेल्वे स्थानक आणि इतर सरकारी ठिकाणी अजून हि अनधिकृत झेंडे फडकविण्यात आले आहेत, हे झेंडे हटविण्यासाठी आपल्याला दिनांक 02/01/2021 रोजी आमच्या संघटनेकडून निवदेन देण्यात आले होते. 08 मार्च 2021 रोजी या संबंधित मोर्चा देखील काढला होता, यानंतर अनेक बैठका आपल्या कार्यालयात झाल्या पण तरीही अनधिकृत झेंडे काढण्यात आले नाहीत, या अनधिकृत झेंड्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होत आहे. देशात एक देश एक झेंडा तत्व अस्तित्वात असताना कर्नाटकात वेगळा कायदा आहे काय? तरी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान रोखुन येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी हे अनधिकृत झेंडे हटविण्यात यावेत राष्ट्रीय ध्वजाचा अवमान रोखुन येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी हे अनधिकृत झेंडे हटविण्यात यावेत.
जर तरीही ते हटविण्यात आले नाहीत तर भारताचे गृहमंत्री अमित यांना 2,00,000 (दोन लाख) स्वाक्षरी असलेले निवेदन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे तरी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन अनधिकृत झेंडे हटविण्यात यावेत अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, विनायक कावळे, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.
