करंबळ ग्रामस्थांकडून पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा
खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन समिती नेते पुंडलिक पाटील यांनी करंबळ येथे व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा देत करंबळ ग्रामस्थांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी पुंडलिक पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत पत्रे पाठवून दिली जाणार आहेत.
या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नाना घाडी, सतीश घाडी, विजय सुतार, महेश नार्वेकर, आप्पाणा पाटील, मारुती पाटील, रामचंद्र भेकणे, अभय घाडी, विष्णू मादार, अभिजीत पाटील, विकास घाडी, सुरज पाटील, विष्णु मादार, संदीप पाटील, सुनील मासेकर, सुरज मादार, शंकर भेकणे, विजय पाटील, जांबोटकर, प्रवीण सुतार, सागर पाटील, आदित्य पाटील, युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
