परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास
निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे तपासण्यासाठी कोटिंगनंतर पाचवेळा ठिकाणातून स्वॅब टेस्ट घेतली जाणार आहे. जर कोटिंग हे प्रभावशाली नसेल तर पुन्हा एकदा ती गाडी कोटिंगसाठी दिली जाणार आहे. या कोटिंगमुळे एसटी प्रवास आता जास्त सुरक्षित असणार आहे.
या कोटिंग प्रक्रियेला हुबळी विभागात लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक आगारानुसार संबंधित कंपनीतील कर्मचारी कोटिंगसाठी जाणार आहेत. एसटी बसमध्ये आसन, हॅन्ड रेस्ट, गाई रेल, रेलिंग, पॅसेंजर डोर आदी ठिकाणी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. एसटी बसला केलेल्या कोटिंगमुळे कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जीवाणूपासून पुरेसे आणि दीर्घकाळ संरक्षण होईल, असे जाणकारांचे मत आहे.
हुबळी विभागातील आगारातून गाड्यांची कोटिंग केली जाणार आहे. एका गाडीला वर्षातून सहा वेळा म्हणजेच महिन्यातून दोन वेळा ही कोटिंग करण्यात येणार आहे. एक गाडी कोटिंग करण्या साठी फक्त वीस मिनिटांचा कालावधी लागणार आहे. जोपर्यंत कोटिंगच्या जागांवर काही खरचटले केले जाणार नाही. तोपर्यंत ती जागा सुरक्षित असेल अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …