मंत्री शशिकला जोल्ले : कोगनोळी येथे आहार किटचे वितरण
कोगनोळी : 2008 साली मी या मतदारसंघात आले. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंघात संकट आले व मी आले नाही असे कधी झाले नाही. परवा आलो नाही याच्या पाठीमागे माझी वैद्यकीय कारण होते. त्यामुळे मी येऊ शकलो नाही याचा अर्थ विरोधकांनी वेगळा काढला. विरोधकांच्या टीकाटिप्पणीकडे लक्ष देत न बसता मतदारसंघाचा विकास कसा होईल याकडे आपण लक्ष दिले आहे. महिला व बाल विकास मंत्री खाते सांभाळत असताना कर्नाटकामध्ये अनेक मुले अनाथ झाली या मुलांचे पुनर्वसन व इतर गोष्टींमध्ये आम्ही लक्ष घातले होते. निपाणी मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मला दुसर्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. मंत्री पदाचा आपण निपाणी मतदारसंघाला कसा फायदा होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे मनोगत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी अरुण पाटील हे होते. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना आहार किटचे वितरण केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने, प्रीतम शिंत्रे, उद्धव काजवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विद्या व्हटकर, स्वाती शिंत्रे, वंदना निकम, आनंदराव हंचिनाळे, सचिन निकम, वैभव पाटील, बबलू पाटील, तौसीफ मुल्ला, विलास नाईक, धनाजी कागले, सचिन पाटील, सुनिल घुगरे, ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवलदार, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, प्रणव मानवी, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव यादव, कुमार व्हटकर यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब कागले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
