बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौर्यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौर्यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मंगल गोगटे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत चंदगडचे राष्ट्रवादीचे आ. राजेश पाटील, कर्नाटक विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta