बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे संस्थापक आणि चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार चोवीस वर्षांपूर्वी बेळगावात श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. बेळगावच्या गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देण्याचे काम बेळगाव गणेशोत्सव फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे.
बेळगाव गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांबरोबरच अशा स्थानिक कलाकारांना कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्रकर्षाने घडले आहे. कलावंतानं बरोबरच श्री गणेश फेस्टिवल दरम्यान महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा प्रत्येक वर्षी नवरत्न पुरस्काराने सन्मान आहे केला जात असतो.
प्रत्येक वर्षी तमाम गणेशभक्त आणि रसिकांना बेळगाव गणेश फेस्टिवलची आतुरता लागलेली दिसून येते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला त्यामुळे गतवर्षी सामाजिक भान राखून प्रशासनाच्या आदेशानुसार बेळगाव गणेश फेस्टिवल रद्द करण्यात आला होता. त्यानंतर यावर्षीही अद्यापही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. शासनानेही विविध कार्यक्रमांवर निर्बंध लागले आहेत. याची दखल घेत आणि नागरिक आणि रसिकांच्या आरोग्याची काळजी घेत, या वर्षीचा श्री गणेश फेस्टिवल रद्द करण्यात आल्याची माहिती गणेश फेस्टिवल आयोजन समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई यांनी दिली आहे.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …