Monday , December 4 2023

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आकर्षक रांगोळी

Spread the love

बेळगाव : 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाचे औचित साधून  बेळगावचे रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून बाजूला 75 पणती (दिव्यंची) आरास केली आहे.. सदर रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. सदर रांगोळी रेखाटण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागला आहे.
रांगोळीसाठी लेक कलरचा वापर केला आहे. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅंप, वडगाव. बेळगाव येथे प्रदर्शन ता. 20 पर्यंत, सकाळी 8 ते सांयकाळी 8  पहावयास खुले आहे.
या रांगोळी संदर्भात अधिक माहिती देताना औरवाडकर म्हणाले, सदर रांगोळीसाठी 5 दिवस लागले. रांगोळी काढण्याचे काम दररोज रात्री स्टुडिओ बंद केल्यावर चार तास होत असे. रांगोळी रेखाटताना वारा आल्यावर खरी कसरत लागते.
देशभक्तांची भावचित्र रेखाटल्या एक नवीन ऊर्जा मिळते. आजपर्यंत जवळ जवळ 125 रांगोळ्या रेखाटल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राणपणाला लावणारे देशभक्त क्रांतीकार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सरदार वल्लभ भाई पटेल, महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, सर्वपल्ली राधाकृष्णन, बाबासाहेब आंबेडकर,डॉ. अब्दुल कलाम,   सनई वादक बिस्मिल्ला खान, पंडित नेहरू, पंडित रवी शंकर,  स्वामी विवेकानंद, अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, आशा भोसले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाज प्रबोधन बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा, वारकरी असे अनेक दिग्गजांचे चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले असल्याचेही औरवाडकर यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा पूर्वतयारीसाठी उद्या व्हॅक्सीन डेपो येथे समिती कार्यकर्त्यांनी जमावे

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *