बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा नाहीतर निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, यावर्षी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत कडक निर्बंध घालत असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामूळे प्रशासनाची दुटप्पी भूमिका जाहीर होत आहे, त्यामुळे पारंपरिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध शिथिल करण्यात यावेत नाहीतर आगामी निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, वासू सामजी, अभिजित मजुकर, अहमद रेशमी, प्रवीण रेडकर, सिध्दार्थ चौगुले, जोतिबा पाटील, निखिल देसाई, महांतेश कोळूचे, आदी उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …