
हिंडलगा : श्री महालक्ष्मी नगर हिंडलगा येथे शिवजयंतीनिमित्त शिवशाहीर पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी त्यांच्या पोवाड्याने सर्वांना शिवशृष्टी अनुभूती करून दिली. हा कार्यक्रम श्रीरामसेना हिंडलगा व युवक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, क्रीडा भारतीचे कर्नाटक राज्य प्रमुख मुकुंद किल्लेकर, रवी कोकितकर, रामचंद्र मन्नोळकर आदींनी केले.
याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, शिवरायांनी केलेला पराक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्याकाळी शाहीर करत होते. त्यामुळे जनतेला हिंदवी स्वराज्याचे कार्य कसे चालले आहे हे समजत असे. एखादी लढाई आपण कशी जिंकली आधी सर्व माहिती शाहीर गावागावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर पोवाडे गाऊन सांगत होते. आजसुद्धा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी पोवाडा हे खूप चांगलं माध्यम आहे आणि हा उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
याप्रसंगी संजय पाटील यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम सेनेचे प्रमुख रवी कोकितकर, स्नेहल कोळेकर, विजय कोळेकर आदींनी प्रयत्न केले.
Belgaum Varta Belgaum Varta