Wednesday , March 4 2026
Breaking News

सिंहगर्जना युवक मंडळाचा “गुरुवंदना“ कार्यक्रमास पाठिंबा

Spread the love

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवारी 15 मे रोजी आयोजित सकल मराठा समाजाचे प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना सोहळ्यास कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाने आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
सकल मराठा समाज बेळगावतर्फे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने कोनवाळ गल्ली येथे सिंहगर्जना युवक मंडळाची बैठक काल मंगळवारी सायंकाळी पार पडली. सदर बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते. त्यांनी पूज्य श्री गुरु मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाची माहिती देताना आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. हिंदुत्वाचे महत्त्व विषद करताना त्यांनी देशातील एकंदर परिस्थिती पाहता मराठा समाजाने संघटीत होणे ही काळाची गरज आहे. तेव्हा सर्वांनी गुरुवंदना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
बैठकीस अर्जुन गवळी, अभिजीत सुणगार, सुनील देसुरकर, बळवंत शिंदोळकर, युवराज चव्हाण, राजू तुडयेकर, चेतन देसुरकर, निखील पानकर, निखील देसुरकर, प्रसाद कुडतुरकर आदींसह सिंहगर्जना युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *