बेळगाव : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाकांक्षी महिलांसाठी उज्ज्वला योजना अंतर्गत बेळगांव ग्रामीणमधील कंग्राळी खुर्द, मोठी कंग्राळी,-आंबेवाडी, मण्णुर, गोजगे, उचंगाव,-सुळगा, बेक्किनकीरे, तुरमुरी, कुद्रेमनी, बेळगुंदी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी व सांवगाव या गावातील महिलांना मोफत गॅस शेगडी कनेक्शन वितरण करण्यात आले.
बेळगांव लोकसभा खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली व बेळगांव ग्रामीण भाजपा माजी अध्यक्ष व तालुका एपीएमसी सदस्य श्री. विनय विलास कदम यांच्या प्रयत्नातून येणाऱ्या काही महिन्यांत प्रत्येक गावामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व महिलांना अजून नवीन गॅस कनेक्शन वितरित करण्यात येणार आहेत.
मण्णुर गावचे सुपुत्र उमेश चौगुले यांनी विशेष प्रयत्न करून सर्व महिलांना याची माहिती देऊन विशेष सहकार्य केले.
यावेळी कुद्रेमनीचे चेअरमन संजय पाटील तेजस्विनी इंटरप्रायझेसचे स्टाफ व महिलावर्ग उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta