बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या प्रयत्नात, कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (KSISF) गुरुवारी (12 मे) दोन स्निफर डॉग्सचा समावेश केला आहे.
विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव विमानतळावर दोन स्निफर डॉग्स, तेजा आणि भूमी यांचा समावेश करण्यात आला होता.
दोन स्निफर सुप्रशिक्षित स्निफर श्वानांच्या तैनातीमुळे बेळगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेला बळ मिळण्याची शक्यता आहे. हे दोन स्निफर डॉग आरडीएक्स, अंमली पदार्थ यांसारखे स्फोटक पदार्थ शोधण्यात सक्षम आहेत, असे विमानतळाच्या अधिकार्याने सांगितले.
विमानतळाने ट्विट करत दिली हि माहिती विमान तळावरील विशेष श्वान पाळण्यासाठी मूलभूत सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे पुरविल्या जातील. परंतु या श्वानांचा दैनंदिन खर्च राज्य सरकार करणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta