बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी (दहावीच्या) परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ नागसुरेश कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक 100% गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबर राज्यात प्रथम आला आहे.
शहरातील टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण संपादन केल्याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील ज्या 143 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत यामध्ये त्याचे स्थान मिळवताना अमोघने स्वतःसह आपल्या शाळेचे आणि बेळगावचे आई-वडिलांचे नांव उज्ज्वल केले आहे.
भाग्यनगर चौथा क्रॉस येथे वास्तव्यास असणारे जीएसएस कॉलेजचे गणित विषयाचे प्राध्यापक नागसुरेश कौशिक यांचा अमोघ चिरंजीव आहे. अमोलची आई जयश्री या गृहिणी आहेत. अमोघ कौशिक याला एम. व्ही. हेरवाडकर शाळेचे शिक्षक अरुण पाटील परिमळा जोशी, शिक्षिका वत्सला आणि वनिता यांच्यासह विशेष करून विद्या क्लासेस या शिकवणी वर्गाचे शिक्षक दीपक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
दहावीच्या परीक्षेतील घवघवीत यशाबद्दल अमोल कौशिकवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta