Wednesday , March 4 2026
Breaking News

कावळेवाडी वाचनालयाला विविध उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त

Spread the love

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्या विधायक विविध उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून ६० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले.
यापूर्वी ३७ हजार रुपये मिळाले होते. उर्वरित २४ हजार रुपये जमा झाले आहेत.
अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या मार्गदर्शनतून गेली चार वर्षे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्यने राबविले जात आहेत.
कविसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध प्रकारचे पुस्तक अभिवाचन, रांगोळी व किल्ला स्पधाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे.
हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
सीमाभागातील साहित्यिकांना एकत्रकरून त्यांच्या कविता वाचनातून मराठी भाषा संवर्धन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
निबंध स्पर्धा आयोजित करणे, स्वरचित काव्य लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन भावीपिढीला वैचारिक सक्षम करण्यासाठी, मराठीभाषा समृद्ध करण्यासाठी सीमाभागात ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
त्यासाठीच मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थाना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात आले आहे.
या अनुदानमुळे भविष्यात कार्य करायला उमेद मिळते. कौतुकाची थाप मिळाल्याने ग्रामीण भागातील मराठी भाषिकांना नवीन ऊर्जा मिळते.
यावेळी गावातील मोहनराव मोरे, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, मनोहर मोरे, यशवंतराव मोरे, धाकलू ओऊळकर, कोमल गावडे, संतोष सुतार, रघुनाथ बाचीकर, दयानंद यळूरकर, कांचन सावंत, प्रुथवी जाधव, एम.पी.मोरे, नारायण प. मोरे, भाऊराव कणबरकर यांनी समाधान व्यक्त केले. यासाठी मालोजीराव अष्टेकर, इंद्रजित मोरे (मुख्याध्यापक) यांचे मार्गदर्शन लाभले.
भविष्यात स्वतंत्र इमारत व्हावीयासाठी प्रयत्न करीत आहे, असा विश्वास पी. आर. गावडे यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *