Saturday , October 19 2024
Breaking News

प्रकाश हुक्केरी प्रभावी नेते, त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही

Spread the love

केपीसीसी अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी
बेळगाव : प्रकाश हुक्केरी हे विकासाच्या क्षेत्रातील नेते, खासदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांना कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत केपीसीसीचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजप नेत्यांना दिले.
विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मत मिळण्यासाठी भाजप, जेडीएससह सर्वांना फोनद्वारे संपर्क साधू शकतो. परंतु आपण कशासाठी कुणाला संपर्क साधावा? केवळ आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करावे, मतदान करण्याची विनंती करावी, अशी प्रतिक्रियाही सतीश जारकीहोळी यांनी दिली. काँग्रेस नेते भाजप नेत्यांना फोनद्वारे संपर्क साधून पाठिंबा देण्यासाठी विचारणा करत असल्याचा आरोप अरुण शहापूर यांनी केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, निवडणुकीची रणनीती हि कला आहे. कोणीही कुणाशीही संपर्क साधू शकतो. आपण काँग्रेस पक्षाशी निगडित आहोत. इतर पक्षाशी आपला संबंध नाही. जो उमेदवार योग्य असेल त्याला मत मिळेल. यासाठी कुणाला संपर्क करण्याची गरज नसल्याचे जारकीहोळी म्हणाले. २५ मे रोजी आमचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. स्थानिक, जिल्ह्यातील नेते या मतदारसंघाशी निगडित नेते केवळ या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यापुढील निवडणूक प्रक्रियेत वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत, असे जारकीहोळी म्हणाले. स्थानिकांना तिकीट दिल्यास पक्षाचा फायदा होईल, या प्रसारमाध्यमांच्या प्रतिक्रियेवर बोलताना जारकीहोळी म्हणाले, स्थानिकांना तिकीट दिल्यास नक्कीच पक्षाला फायदा होईल. यात तिळमात्र शंका नाही. शिक्षक आणि पदवीधरांची संख्या अधिक आहे. यामुळे या मतदार संघात विजयी होण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे जारकीहोळी म्हणाले. काँग्रेसकडून लॅपटॉप वितरित होत असल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे. या आरोपाला प्रत्त्युत्तर देता जारकीहोळी म्हणाले, ज्यांनी आमच्यावर हा आरोप केला आहे त्यांनीच लॅपटॉप वितरित केले असावेत. अनेक समस्या आहेत. या समस्यांवर बोलण्याऐवजी अनावश्यक विषयांवर चर्चा करण्यात येत असून हि निवडणुकीची स्ट्रॅटेजी असल्याचे जारकीहोळी म्हणाले. शिक्षक संघटनांना आपण अद्याप ओळखलो नाही. परंतु अनेक शिक्षक काँग्रेस समर्थक आहेत. १० वर्षे आपण मोदी सरकार अनुभवले आहे. यामुळे आता जनता आपल्याबाजूने नक्कीच येईल. मतदारांची मने आता काँग्रेसकडे वळली आहेत, असे जारकीहोळी म्हणाले.
यावेळी प्रकाश हुक्केरी, सुनील संक, माजी मंत्री ए. बी. पाटील, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कौजलगी, माजी आमदार रमेश कुडची, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार फिरोज सेठ, माजी आमदार वीरकुमार पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवलगट्टी, नगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *