
नदी प्रवाह, पूर व्यवस्थापन तयारीची पाहणी
बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृष्णा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या चिकोडी व कागवाड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चिक्कोडी येथून मांजरी पुलाला भेट दिली आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाहाची माहिती घेतली. यडूर, कागवाड तालुक्यातील मंगावती आणि जुगुळ या गावांना भेट दिली आणि 2019 आणि 2021 च्या पुरादरम्यान झालेल्या हानीची ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पूरस्थिती प्रसंगी गावकरी आणि पशुधनाच्या संरक्षणास प्राधान्य दिले पाहिजे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्या प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सर्व तयारी केली आहे. कोणतीही हानी होऊ नये यासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta