बेळगाव : बेळगाव हेस्कॉम कार्यालयातील दोन भ्रष्ट अधिकार्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. अनिल बेनके म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. 2 अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. याबाबत तातडीने चौकशी करण्याची सूचना देईन, त्याचप्रमाणे ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्याची मागणी करेन. भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार तुम्ही केल्यावर पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी आपली आहे असे आश्वासन आ. बेनके यांनी कंत्राटदारांना दिले.
Belgaum Varta Belgaum Varta