बेळगाव : बेंगलोर येथे क्रीडा युवर्जन खात्यातर्फे नुकताच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खो-खो मिनी ऑलम्पिक (14वर्षा खलील) क्रीडा स्पर्धेत चांगलेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या दोन विद्यार्थिनी कु.अदिती परशराम बिजगरकर व हर्षदा राजाराम पांडुचे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बेळगाव जिल्हा संघाने उपांत्य फेरीत धारवाड संघाचा 1 गुणाने पराभव केला तर हावेरी संघाचा 8 गडी राखून पराभव केला व अजिंक्यपद मिळविले.
या निमित्त हायस्कूलमध्ये या विद्यार्थिनींचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर व सचिव प्रसाद मजुकर यांनी गौरवनिधी देऊन सत्कार केला व यापुढेही क्रीडा स्पर्धेत सुयश चिंतिले. या विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या विद्यार्थिनींना हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अरुण पाटील व क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
Check Also
सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
Spread the love बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …