Saturday , December 14 2024
Breaking News

टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

Spread the love

नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान यासीनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. निकालापूर्वी श्रीनगरमधील काही भागांची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीनगरच्या मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. याआधी पोलिसांनी यासीनच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. येथे ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात येत आहेत.
‘मला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सामोरे जायचे नाही’’, असे मलिक याने न्यायालयाला यापूर्वी सांगितले होते. मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. २०१७ च्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात कलम १२०-ब गुन्हेगारी कट, कलम १२४-अ देशद्रोहचे आरोप मलिकवर लावण्यात आले.
दहशतवादी बुरहानी चकमकीत ठार झाल्यानंतर २०१६-२०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली. यानंतर तपास यंत्रणा एनआयएने यासीन मलिक आणि अन्य फुटीरतावाद्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मलिकने सर्व आरोपांची कबुली दिली.

About Belgaum Varta

Check Also

अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट

Spread the love  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *