बेळगाव : अमृत पंचायत अंतर्गत येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये चालू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. डिजिटल लॅबररी, अंगणवाडी, सरकारी शाळा, जलजीवन मिशन (24×7 पाणी पुरवठा योजना) तसेच सुखा कचरा, ओला कचरा संग्रहित केंद्र यांची पाहणी करून एकंदरीत सुरू असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली व कौतुक केले. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयाची पाहणी करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, पिडिओ, सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील कामना चालना देण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, दर्शन सीईओ जिल्हा पंचायत बेळगाव, राजेश धनगुटकर, ईओ तालुका पंचायत बेळगाव, पिडिओ अरुण नाईक, सदस्य, प्रमोद पाटील, शशीकांत धुळजी, कर्मचारी वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta